एम एच 07 / 9190 असल्या भंगार एसटी बस , महामंडळ ठेवतेच कशासाठी ??
माझे गाडीचा प्रॉब्लेम होता..कोर्टात निघणेची घाई होती..मिळेल त्या वाहनाने पंढरपूर गाठायचे ठरवून घरासमोरील रस्त्यावर आलो..तेवढ्यात एसटी बस आली..हात केला..ड्रायव्हरने गाडी थांबवली..तिकीट काढले..केबिनमध्ये सीट शिल्लक होती..तिथे बसलो..पाच मिनिटात सुस्ते चौकात आलो..तेथे गाडी उभा राहणे अगोदर चौकातील चार पाच जण ओरडत ड्रायव्हरला हाताने इशारा करीत होते..ड्रायव्हरला काय झालेय विचारले..ते गाडीतून उतरत उतरत मला बोलले--गाडीची बंपर वजा पुढील आडवी मोठी पट्टी तुटलेली आहे ..मी देखील गाडीतून खाली उतरलो..माझे गाव असल्याने तेथील दुकानातून दोरी आणून मी व ड्रायव्हरने ती तुटलेली आणि रोडला घासत असलेली पट्टी पत्रा दोरीचे साहाय्याने घट्ट बांधला..नंतर गाडीत बसलो..बस पुढे मार्गस्थ झाली.
जात जात ड्रायव्हरला बोलते केले..केबिनमध्ये डोकावून पाहिले..हादऱ्यात पूर्ण केबिन हालत होते..पुढील काच फुटलेली होती..केबिनमध्ये तुटलेले कांही पार्ट ठेवलेले होते..गाडीचा घेर पडत न्हवता..ड्रायव्हर ताकत लावून घेर टाकत होते..गियरला दोरी बांधली होती..गाडीचा ब्रेक नीट लागत नव्हता.. कराकरा आवाज येत होता..केबिनमधील अवस्था न पाहण्यासारखी होती..गाडीची दयनीय अवस्था पाहून तिचे वय पंचवीस तीस वर्षे असावे याची खात्री झाली.
बस पंढरपूर येथे अलीकडेच भीमा स्टॉप वर थांबली..गाडी थांबताना मोठा आवाज झाला..ड्रायव्हरला विचारले काय झाले..त्यांनी सांगितले..क्लच प्रॉब्लेम झाला..पाच दहा मिनिटे थांबलो..ट्राय करून ड्रायव्हर घामेजला..शेवटी ती बंद पडलेली एसटी चालू झालीच नाही..गाडीतील सर्व पॅसेंजरला तिथेच उतरावे लागले..गाडी तिचे स्टँडपर्यंत देखील पोहचु शकली नाही..मीही उतरून तिथूनच त्या एसटीचा निरोप घेतला..आणि पुढे मार्गस्थ झालो..कधी नव्हे तो मी एसटीत बसलो होतो..सुखकर प्रवास मिळायचे ऐवजी मनस्ताप मिळाला.
यातून महामंडळाला माझा प्रश्न आहे..असल्या जुनाट ,नादुरुस्त आणि वापरण्या अयोग्य बसेस तुम्हीं ठेवताच कशाला ?? या अशा खिळगा झालेल्या खिळखिळ्या झालेल्या बसेस जवळपासचे खेडेगावच्या माथी कां मारता ?? वापरण्याची मुदत संपलेल्या एसटी बसेस रस्त्यावर धावतातच कशा ??मोटार वाहन कायद्याचे आरटीओ चे नियम एसटीला लागू नाहीत काय ?? गावाकडील रस्ते अगोदरच बाद आहेत आणि या अशा बसेस खेड्यात पाठवून प्रवाशांची प्रतारणा हे करतातच कसे हेच कांही कळत नाही..एसटीचा मेकॅनिकल विभाग करतो आहे काय??गाडीची बेकार आणि धोकादायक अवस्था त्यांना दिसत नाही काय ??
शेवटी एकच मागणी..या एक्सपायरी झालेल्या एसटी बसची चौकशी करावी..वापरण्या अयोग्य असलेली ही बस खरेच रिटायर करावी..लोकांचे जीव महत्वाचे आहेत..प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या आणि कालबाह्य झालेल्या ,अपघाताला खात्रीने आमंत्रण देणाऱ्या या एसटी बसला पंढरपूर एसटी डेपोने कायमची विश्रांती द्यावी. जुन्या असणाऱ्या बसचे मेकॅनिकल ऑडिट केले जावे..बसेस रस्त्यावर बंद पडायचे प्रकार वाढत आहेत..
शब्दांकन.. विजयकुमार नागटिळक..
सुस्ते ,ता.पंढरपूर..

