मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
स्व. मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ करत, हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षप्रेमी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आदरणीय अजितदादांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने हा क्षण आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि हळवा होता. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दादांविषयी असलेला जिव्हाळा, आदर आणि प्रेम याची जाणीव यावेळी प्रकर्षाने झाली. पक्ष उभारणीपासून आजवरच्या प्रत्येक टप्प्यावर दादांचे नेतृत्व, कार्यकर्त्यांवरील माया आणि संघर्षातून मार्ग दाखवणारे व्यक्तिमत्त्व आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान राहिले आहे. आज त्यांच्या आठवणींनी मन भरून आले.
या प्रसंगी पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या संघर्षमय व गौरवशाली प्रवासासाला उजाळा मिळाला. जनसेवा, विकास आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आणखी अधिक जोमाने कार्य करण्याचा यावेळी संकल्प केला.
यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सनिल तटकरे , पक्षाचे युवा नेते खासदार पार्थ पवार, व पक्षाचे सर्व आजी माजी मंत्री महोदय, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


