करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री हनुमान जयंती निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाबरोबर यंदा पहिल्यांदाच वाफळकरवस्ती हनुमान मंडळ , आणि जि.प.प्राथमिक शाळेच्या वतीने भव्यदिव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
तसेच आदल्या दिवशी बळीराम महाराज व्यवहारे यांचे हरीकीर्तन हनुमान जयंती दिवशी पहाटे अभिषेक, पूजा, पाळणा, आणि भजन आदी कार्यक्रम भव्यदिव्य प्रतिवर्षाप्रमाणे साजरे होत असताना आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये वाफळकर वस्ती व परिसरातील बांधवांनी जवळपास ४० जणांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
यावेळी वाफळकरवस्ती धरिला दिव्यांग राजाभाऊ वाफळकर यांनी ही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून फक्त तीस कुटुंबांची वस्ती असलेल्या वापरकर वस्तीवरील पुढील भविष्यकाळात ही अनेक विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरख वसेकर,ज्ञानेश्वर आप्पा वसेकर,कैलास वसेकर,कांतीलाल वसेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख , आयरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वसेकर,, बिभीषण वसेकर, नवनाथ वसेकर,समाधान वसेकर, हनुमंत वसेकर,विशाल वसेकर,सावता वसेकर,रामदास माळी,अनेक वाफळकरवस्ती वरील सर्वांनी अधिक परिश्रम घेत आहेत.

