पंढरपूर प्रतिनिधी अमोल कुलकर्णी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथे श्री सिताराम महाराजांच्या दर्शनासाठी अमावस्या,गुरुवार आणि हजारो भाविक रोज येत असतात तसेच शाळकरी मुलां-मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पंढरपूर सांगोला येथे जावे लागत असते.
वृद्ध व्यक्ती महिला यांना पंढरपूर व सांगोला येथील बस स्थानकातून खर्डी व सुपली पळशी फाटा बस थांबत नसल्याने अनेक प्रवाशांना खाली उतरवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.तिकीट मशीनवर प्रिंट येत नाही हे कारण सांगून वाहक व चालक अत्यंत उर्मट भाषेत वर्तन करत आहेत.त्यामुळे शाळकरी मुले व वृद्ध व्यक्तींची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आल्याने पंढरपूर पंचायत समितीचे धडाडीचे सभापती डॉ.शुभम आगवणे यांनी तातडीची बैठक बोलवून आगार प्रमुखांना पत्र काढून सदर घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
या अनुषंगाने पंढरपूर सांगोला व सोलापूर महामार्गावर खर्डी येथे सर्व बस गाड्या थांबवण्यात याव्यात असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.तसेच पंढरपूर सातारा महामार्गावरील सुपली व पळशी या गावातील प्रवाशांसाठी सुपली फाटा येथे थांबा मंजूर करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट उल्लेख केलेला आहे.सदर घटनेची दखल न घेतल्यास दोन्ही महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
सांगवी,जाधववाडी बस सुरू करणे,कासेगाव तपकिरी शेटफळ फेरी सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. याबाबत डॉक्टर शुभम आगवणे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
सभापती शुभम आगावणे यांनी प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल प्रवाशी, महिला व ग्रामस्थांनी आगावणे यांचे कौतुक करून आभार मानले आहेत.

