मीरा भाईंदर प्रतिनिधी तेज न्यूज
नव बौद्ध मित्र मंडळ मीरा दातार दर्गा गल्ली माजगाव पूर्व रे रोड येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सवा निमित्त मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
कला दर्पण नृत्य अकॅडमी मार्फत डान्स गाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वायाळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सादर केली
तसेच संस्थापक अध्यक्ष कलादरपण नृत्या अकॅडमी दीपक तेंडुलकर यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे आयोजन केले होते
गायिका राखी तेंडुलकर छत्रपती शिवाजी महाराज , गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका दीपक देवळे यांनी सादर केली. त्यांचे सहकारी अमित शिवलकर यांचे सहकार्य लाभलं
कलादर्पण नृत्य अकॅडमी भटवाडी घाटकोपर मार्फत योगा एक्टिंग व डान्स क्लासेस चे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे तरी कृपया ज्या कोणाला योगा डान्स अॅक्टींग क्लासेस मध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी संस्थापक अध्यक्ष दीपक तेंडुलकर 8369534293 यांच्याशी संपर्क करावा.


