करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सद्गुरु भजलिंग महाराज ट्रस्ट करकंब यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे अक्षयतृतीया आणि चंदन उटीच औचित्य साधून दिनांक १७,१८,१९, एप्रिल या तीन दिवसात सद्गुरु भजलिंग महाराज मठामध्ये संध्याकाळी ६ ते ८ ह.भ.प.डॉ.जयवंत महाराज बोधले यांचे अमोघ वाणीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या पसायदान या सुंदर विषयावर तीनदिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आली असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते यांनी सांगितले.
या आधीही कर्मयोग, भक्तीयोग,नामस्मरण,आदी विषयांवर प्रवचन माला झाली असून सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.आणि आताही पुढील तीन दिवस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि अध्यात्मिक विचारांच्या मेजवानीचा सर्व करकंबकर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.
प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्ट विद्याताई वास्ते,संजय दुधाणे, श्रीनिवास देशपांडे काका,आणि ज्ञानेश्वर दुधाणे शिष्य परिवार अधिक परिश्रम घेत आहेत.


