वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
सोलापूर येथे नुकतीच सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या यामध्ये माळशिरस तालुक्यामधून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी व दहिगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संस्कृती सातपुते यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण च्या सभापती पदी निवड करण्यात आली.
यानंतर सायंकाळी त्या वेळापूर मार्गे मांडवे येथे जात असताना वेळापूर येथे भाजपाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आराध्य दैवत अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी जि.प. सदस्य चंद्रकांत जाधव, महादेव देवालय ट्रस्ट अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, वेळापूर सोसायटी चेअरमन अमरसिंह माने देशमुख, सोसायटी व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, माजी जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, पिनुभाऊ एडगे, काकासाहेब जाधव,मदनसिंह माने देशमुख, गणेश चव्हाण, संदीप माने देशमुख, राहुल माने देशमुख, उमेश भाकरे,महेश साठे, शरद साठे, अजय शिंदे,ओंकार खराडे दत्तू साठे, महादेव नाईकनवरे ,दत्ता एडगे,अशोक जगदाळे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

