अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेतलेले आवश्यक आहे. तसेच 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे किमान 20 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असणार आहे. तर भरती नियमानुसार, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात येणार असून ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात येणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) अंतर्गत सहाय्यक कमांडंट (गट अ) (Assistant Commandant - Group A) पदांच्या एकूण 349 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2026 आहे.
या भरती मोहिमेअंतर्ग सीमा सुरक्षा बल (BSF) 108 पदे, केंद्रीय रिजर्व पुलिस बल ( CRPF) – 106 पदे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) – 70 पदे, सशस्त्र सीमा बल ( SSB) – 53 पदे, तर भारत‑तिब्बत सीमा पुलिस (ITBP) – 12 पदे अशा एकून 349 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेतलेले आवश्यक आहे. तसेच 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे किमान 20 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असणार आहे. तर भरती नियमानुसार, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात येणार असून ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात येणार आहे. यासाठी खुला प्रवर्ग/ओबीसी उमेदवारांना 200 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे तर, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्कातून सुट देण्यात आली आहे.


