नवीन पनवेल प्रतिनिधी तेज न्यूज
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, मुंबई विभागीय केंद्र,आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल,पदवीधर प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य, व युवा शक्ती फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती पदवीधर प्रकोष्ठचे राज्य संयोजक धनराज विसपुते यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील २० पेक्षा अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये २५०० पेक्षा अधिक रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता सर्व शाखेतील पदवीधर,दहावी, बारावी पास- नापास आय - टी आय सर्व ट्रेड,डिप्लोमा- इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ,CNC ऑपरेटर CIPET
वयोमर्यादा१८ ते ३५ वर्षे मेळाव्याची तारीख व वेळ रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत.मेळाव्याचे ठिकाण दादासाहेब धनराज विसपुते सभागृह, आदर्श शैक्षणिक संकुल. देवद, विचुंबे, पनवेल. जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे.सूचना पुढील प्रमाणे आहेत.नोंदणी केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मुलाखतीस येताना बायोडेटाच्या ४ ते ५ प्रती आणाव्यात.आधार कार्ड ची एक प्रत सोबत आणावी.मेळाव्यासाठी नोंदणी करण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरावा.
https://forms.gle/kY3qRwRqjQMvxij38
नोंदणी अनिवार्य करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा.9930394475,8879338833,8605177579

