पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मुलांमध्ये विज्ञान विषयाची आवड होऊन विज्ञानाचा योग्य वापर व्हावा व मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा व त्यांचे मनामध्ये विज्ञान विषयाचे अनेक प्रश्न निर्माण होऊन त्याच्यामध्ये जिज्ञासा वाढावी या उदात्त हेतूने श्री. रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व जुनिअर कॉलेज पंढरपूर येथे 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे प्रतिमेस प्राचार्या सौ. गायकवाड एन.व्ही. यांचे शुभहस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना विज्ञान शिक्षिका माधुरी बोडके म्हणाल्या की विज्ञान हे गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते.असे सांगून विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत मुलांनी विद्यार्थी दशेतच विज्ञानाचा दृष्टिकोन वाढवावा व समाजातील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रशालेत वैज्ञानिक उपक्रमाशी संबंधित असे भाषण, निबंध ,शास्त्रज्ञांचे लेखन, विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन व परिसंवाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या गायकवाड एन.व्ही. व पालक वर्ग तसेच प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोत यांनी केले.तर आभार गणेश डुबल यांनी माणले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुमुदीनी सरदार, अभिजीत कोष्टी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले

