गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये गेली 33 वर्षे कार्यरत असून विविध शैक्षणिक उपक्रमात भाग घेऊन अनेक पारितोषिक ही मिळवलेली आहेत. लोकसंख्या शिक्षण या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली होती. असोसिएट एनसीसी ऑफिसर वेल्फेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय बेस्ट एन सी सी ऑफिसर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे असे असे शंभरहून अधिक आदर्श शिक्षक व बेस्ट एनसीसी ऑफिसर म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत .
राष्ट्रीय छात्र सेनेच्या ,(NCC) माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, साक्षरता अभियान, पर्यावरण रक्षण, तंबाखू मुक्त अभियान, हेल्मेट वाटप प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर , मतदार जनजागृती , स्वच्छ नदी अभियान,रस्ता सुरक्षा अभियान , संविधान दिन , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ,माझी माती माझा देश, युद्ध नौका भेट, कारगिल विजय दिवस असे विविध उपक्रमातून भावी आदर्श सैनिक घडविण्याच्या प्रयत्न करीत आहे . आज अनेक कॅडेट भारतीय सैन्याचा भरती झालेले आहेत.
शाळेत सहशालेय विविध चित्रकला स्पर्धा ,फलकलेखन, करोना काळातील शैक्षणिक साहित्य वाटप, किराणा वाटप, लशीकरण मोहीम,अशा विविध सामाजिक उपक्रमाव्दारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत.त्याच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय नवशिक्षित महाराष्ट्र गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे उदघाटक मोहन राठोड ( IPS ) सेवानिवुत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात निर्मल कुमार देशमुख ( IAS) तत्कालीन जिल्हाधिकारी मुंबई उपनगर , अनंत उर्फ बाळा नर आमदार अमोल कीर्तिकर शिवसेना उपनेते जितेंद्र वळवी नगरसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केले होते.

