पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे किंवा भाषेचे मर्यादित राजे नव्हते, तर ते संपूर्ण जगाला दिशा देणारे 'विश्वमानव' होते. त्यांच्या सुप्रशासनाची आणि न्यायाची शिकवण आजच्या आधुनिक जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाय आहे. याच उदात्त हेतूने 'भारत क्रांती मिशन'च्या वतीने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ऐतिहासिक 'आंतरराष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा' भगवान जगन्नाथाच्या पावन भूमीत, जगन्नाथ पुरी येथे संपन्न होणार आहे अशी माहिती भारत क्रांती मिशनचे समन्वयक उत्तमराव मांढरे सरकार यांनी दिली..
रथयात्रेत उसळणार जनसागर : लाखों-करोडो शिवभक्तांचे दर्शन
नाशिक ते जगन्नाथ पुरी या प्रवासात ही रथयात्रा ज्या ज्या शहरातून आणि गावातून जाईल, तिथे छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी लाखों-करोडो लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीपासून ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत शिवविचारांचा हा 'महाकुंभ' ऐतिहासिक ठरणार असून, ठिकठिकाणी या रथयात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले जाईल. हा प्रवास केवळ भौगोलिक नसून, तो शिवभक्तांच्या भावनांचा आणि राष्ट्रप्रेमाचा विराट आविष्कार असेल.
विशेष उपक्रम: 'एक वेळ, एक गर्जना' (सकाळी १०:०० वाजता)
या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता भारतवर्षासह जगातील १५० देशांमध्ये एकाच वेळी 'शिवराष्ट्र' गर्जना केली जाणार आहे. या क्षणी देश-विदेशातील कोट्यवधी शिवभक्त आपापल्या स्थानी एकत्र येऊन शिवरायांना मानवंदना देतील, जो जागतिक स्तरावरील एक नवा विक्रम ठरेल.
ठळक वैशिष्ट्ये:
राष्ट्रगौरव रथयात्रा: नाशिक दि. १४ फेब्रुवारी ला निघणार असुन ती जगन्नाथ पुरी असा ५ दिवसांचा गौरवशाली प्रवास करणार आहे.जागतिक व्याप्ती: जगातील १५० देशांमध्ये 'जागतिक शिवराष्ट्र दिन' म्हणून शिवजयंती साजरी होणार.
अटक ते कटक: मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान इतिहासाची पुनरावृत्ती करत महाराष्ट्राचा स्नेह ओडिसाच्या भूमीशी जोडला जाणार.१४० कोटी भारतीयांचा अभिमान: 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा हा सोहळा ठरेल.
रथयात्रेचा सविस्तर मार्ग (१४ ते १८ फेब्रुवारी २०२६):
१. १४ फेब्रुवारी: नाशिक (प्रारंभ) ➡️ सिन्नर ➡️ छत्रपती संभाजीनगर ➡️ जालना ➡️ सिंदखेड राजा (मुक्काम). २. १५ फेब्रुवारी: सिंदखेड राजा ➡️ कारंजा लाड ➡️ वर्धा ➡️ नागपूर (मुक्काम). ३. १६ फेब्रुवारी: नागपूर ➡️ भंडारा ➡️ रायपूर, छत्तीसगड (मुक्काम). ४. १७ फेब्रुवारी: रायपूर ➡️ संबळपूर, ओडिसा (मुक्काम). ५. १८ फेब्रुवारी: संबळपूर ➡️ कटक ➡️ भुवनेश्वर ➡️ जगन्नाथ पुरी (आगमन व मुक्काम).
१९ फेब्रुवारी २०२६: महासोहळ्याचे नियोजन सकाळी ७:०० वा: जगन्नाथ पुरी समुद्रकिनारी शिवरायांच्या मूर्तीचा मंगलमय 'दुग्धाभिषेक' आणि 'जलाभिषेक'.सकाळी ९:०० वा: जगन्नाथ मंदिराच्या पवित्र 'अरुण स्तंभापासून' भव्य रथयात्रेचा प्रारंभ.सकाळी १०:०० वा: विश्ववंदन सोहळा – जगभरात एकाच वेळी शिवरायांचा जयघोष.दुपारी ४:०० वा: भगवान जगन्नाथाच्या साक्षीने या ऐतिहासिक जागतिक सोहळ्याची भव्य सांगता.
आयोजकांचे आवाहन:
"हा सोहळा म्हणजे सह्याद्रीची 'शक्ती' आणि जगन्नाथाची 'भक्ती' यांचा अभूतपूर्व संगम आहे. लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे," असे आवाहन भारत क्रांती मिशनचे समन्वयक उत्तमराव मांढरे सरकार व मुख्य समन्वयक सरदार विजय काकडे पाटील यांनी केले आहे.
संपर्क साधा उत्तमराव मांढरे सरकार ( समन्वयक, भारत क्रांती मिशन ) मो.: +९१ ८८०६०५०९८९

