पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील 'दुरुगकर मंगल भांडार'चे मालक मधुकर पंडितराव दुरुगकर (वय ८५) यांचे गुरुप्रतिपदा, सोमवार दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी वृद्धकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पंढरपूरच्या व्यापारी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी लाभलेले मधुकर दुरुगकर यांनी आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने 'दुरुगकर मंगल भांडार' या व्यवसायाचा नावलौकिक वाढवला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या पश्चात महेश मधुकर दुरुगकर, गणेश मधुकर दुरुगकर, संतोष मधुकर दुरुगकर ही ३ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दुरुगकर परिवाराच्या या दुःखात संपूर्ण पंढरपूरकर सहभागी असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

