पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील गुणवत्तेची पुनःप्रचिती देणारी आहे.
या विभागातील सोहम प्रशांत मोदी व विशाल मोहन मिसाळ या होतकरू विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), धारवाड येथे रिसर्च इंटर्न (Embedded Systems) म्हणून निवड झाली आहे. सध्या हे दोन्ही विद्यार्थी संशोधनाभिमुख प्रकल्पांत सक्रिय सहभाग घेत असून 3D LiDAR तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक संशोधनकार्य करीत आहेत.
हे उल्लेखनीय यश महाविद्यालयाच्या भक्कम शैक्षणिक परंपरेचे, संशोधनपूरक वातावरणाचे तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण व योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे. सदर निवड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी नेतृत्व व सततच्या पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे.
महाविद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग या दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असून त्यांच्या उज्ज्वल, यशस्वी व संशोधनसमृद्ध भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत आहेत.


