पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला येथील अतुल शिवाजी बनकर यांची शरदचंद्रजी पवार गट पदवीधर संघटना तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना नुकतेच निवडीचे पत्र खासदार धौर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
खा. शरदचंद्रजी पवार , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील,खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे , पदवीधर चे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक रविंद्र पाटील, सोलापूर पदवीधर चे जिल्हाध्यक्ष संकेत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
यावेळी पदवीधर जिल्हाध्यक्ष संकेत चव्हाण, सांगोला तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत, ज्ञानेश्वर चव्हाण,अमेय काकुळे ,रोहन चौगुले, प्रजित मोरे , आशीर्वाद जाधव, धैर्यशील कोळेकर,माऊली बाळापुरे , अथर्व कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
अतुल बनकर यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

