माणगाव प्रतिनिधी तेज न्यूज
कुमशेत गावात सर्व गावकऱ्यांनी मिळून गुण्यागोविंदाने रहावे, सर्व सण विनाविघ्न साजरे करावेत अशी कुमशेत गावातील गावकऱ्यांची इच्छा असते, परंतु गावातील एका कुटुंबामुळे गावातील रहिवासी तळावाखाली, भयभीत व त्रस्त आहेत.गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनही अपयशी ठरलेले आहे.
कुमशेत गावातील बळीराम नारायण कडू,नरेश बळीराम कडू यांची पत्नी, नम्रता नरेश कडू तिची मुलगी भूमी नरेश कडू यांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत पत्रा शेड व बांधकाम करुन लाकडी बांबुनी रस्ता अडवून ठेवला आहे.अशामुळे भांडण व मारामारी करण्यास बळीराम कडू परिवार स्वतःहून हाणामारीवर येत असतात.देवीची पालखी परंपरेनुसार ज्या रस्त्यावरुन जात असते तो रस्ताच अनधिकृत बांधकाम करुन अडवलेला आहे.सर्व संबंधित प्रशासनाला अर्ज करुनही कुमशेत गावातील ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही.स्थानिक पोलीस स्टेशनलाही बळीराम कडू कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, परंतु पोलीस व सरपंच यांचेही बळीराम कडू ऐकत नाही, जास्त प्रमाणात गुंडगिरी व दहशत निर्माण झालेली आहे, त्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.
बळीराम कडू याने सुरेश शाबाजी कडू,त्यांची दोन मुलं, सुरेश श्रीपती कडू व त्यांची दोन मुलं,राम गोपाळ कडू, प्रकाश गोपाळ कडू,आसाराम भाऊ दळवी, चंद्रकांत आबाराम दळवी, विवेक आबाराम दळवी, सुबोध रामचंद्र चव्हाण,दयाराम बाळाराम कडू, जनार्दन नारायण कडू, मंगेश राजाराम कडू, संतोष चंद्रकांत कडू,प्रितेश प्रविण दळवी यांच्यावर विनाकारण खोट्या केसेस दाखल केल्या आहेत.
त्यांच्या या अडेलतट्टू धोरणामुळे गावातील शांतता भंग झालेली आहे.बळीराम कडू हे सेवा निवृत्त पोलिस पाटील आहेत त्याचा ते गैरफायदा घेत आहेत.असेच होत राहिले तर एक दिवस उद्रेक होईल, त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी व महसूल प्रशासन यांनी या अनधिकृत प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता मोकळा करुन द्यावा व गावात शांतता प्रस्थापित करावी अशी कुमशेत गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.
यासंर्भात गावकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कुमशेत ग्रामस्थांच्या वतीने पत्र देण्यात आले आहे.

