पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उमा महाविद्यालय पंढरपूर भूगोल विभाग व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "आपत्ती व्यवस्थापन "या विषयावर भूगोल विषयाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच इंग्रजी विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए भाग दोन,शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील नवीन अभ्यासक्रमावरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भूगोल विषयाची परिषद व इंग्रजी विषयाची कार्यशाळा यांचे आयोजन उमा महाविद्यालय पंढरपूर येथे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.आ.प्रशांतराव परिचारक, उपाध्यक्ष. मुकुंदराव परिचारक, संस्थेचे विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, संस्थेचे विश्वस्त सी एम जोशी, संस्थेचे विश्वस्त रमेश लाड, संस्थेचे विश्वस्त ॲड. प्रणव परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड तसेच पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्र.कुलगुरू प्रो. डॉ. लक्ष्मीकांत दामा, तसेच डॉ संभाजी शिंदे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माजी प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट (अध्यक्ष सोलापूर जिल्हा भूगोल शिक्षक संघ) प्रो.डॉ मनोहर जोशी, प्रो.डॉ.दीपक ननवरे, डॉ.सचिन लोंढे, डॉ.हनुमंत अवताडे डॉ.नेताजी कोकाटे हे साधन व्यक्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. यांच्या उपस्थितीत या परिषदेचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग,संशोधक विद्यार्थी यांनी आपले शोध निबंध महाविद्यालयात पाठवून द्यावेत. या कार्यशाळेस व परिषदेस उपस्थिती दर्शवावी असे महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

