पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारताचे माजी पंतप्रधान आणि 'देशाचे भूमिपुत्र' म्हणून ओळखले जाणारे एच. डी. देवेगौडा यांनी गुरुवारी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. वयाची 92 वर्षे पूर्ण केलेल्या देवेगौडांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा अनोखा प्रत्यय यावेळी पंढरपूरवासीयांना आला.
कडाक्याच्या थंडीत चंद्रभागा स्नान
दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे देवेगौडांचे चंद्रभागा स्नान. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही त्यांनी पंढरीच्या चंद्रभागा नदीत जाऊन हातपाय धुतले. 92 व्या वर्षीही त्यांची ही जिद्द आणि विठ्ठलाप्रती असलेली भक्ती पाहून उपस्थित वारकरी आणि नागरिक थक्क झाले. नदीकाठी त्यांनी काही वेळ प्रार्थनाही केली.
विठ्ठल चरणी लीन
स्नानानंतर देवेगौडांनी थेट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवला. s) मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रकृती उत्तम, उत्साह कायम
गेल्या काही दिवसांपासून देवेगौडांच्या प्रकृतीबाबत चर्चा होत्या, मात्र या भेटीने त्यांनी सर्वांनाच चकित केले. "विठ्ठलाच्या दर्शनाने मनाला मोठी शांती मिळाली," अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या दौऱ्यात त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचे काही मोजके पदाधिकारी उपस्थित होते.

