पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात दिनांक २ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत द्वितीय वर्ष (एस.वाय.) व तृतीय वर्ष (टी.वाय.) यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विविध व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्स यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्ये, उद्योगसुसंगत ज्ञान व व्यावहारिक अनुभव देऊन भविष्यातील रोजगारासाठी सज्ज करणे हा होता.
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “हॅण्ड्स-ऑन प्रॅक्टिसेस ऑन मॅन्युफॅक्चरिंग अँड मेट्रोलॉजी टेक्निक्स” या विषयावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मशीन शॉप डेमॉन्स्ट्रेशन व जॉब प्रिपरेशन डॉ. ए. एस. आराध्ये, प्रा. एस. एस. साळुंखे, प्रा. ए. एस. कुलकर्णी व एस. पी. म्हेत्रे ), स्टिर कास्टिंग डेमॉन्स्ट्रेशन (प्रा. ए. एस. कुलकर्णी, प्रा. व्ही. व्ही. नवले), मेट्रोलॉजी अँड मेकॅनिकल मेजरमेंट्स लॅबोरेटरी (डॉ. एस. आर. कोळी, प्रा. डी. आर. गिराम), अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग लॅबोरेटरी (थ्री-डी प्रिंटिंग डेमो) (प्रा. यू. एस. घोलप, प्रा. ए. डी. जाधव, प्रा. ए. एस. गोडसे) तसेच पावडर मेटलर्जी लॅबोरेटरी (हॅण्ड्स-ऑन प्रॅक्टिसेस) (प्रा. एस. बी. महारनवर, प्रा. एम. डी. जोशी) यांचा समावेश होता.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सैद्धांतिक ज्ञान व प्रत्यक्ष औद्योगिक कार्यपद्धतीतील अंतर कमी होण्यास मोठी मदत झाली.
तृतीय वर्षाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विभागामार्फत इंडो-जर्मन टूल रूम, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) यांच्या सहकार्याने सॉलीडवर्क्स २०२४ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात एकूण ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
हा प्रशिक्षण कार्यक्रम श्री. राज बनकर व श्री. प्रशांत चौधरी (इंडो-जर्मन टूल रूम) यांनी घेतला. प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना कॅड आधारित डिझाईन, मॉडेलिंग व उद्योगसुसंगत डिझाईन कौशल्ये प्रत्यक्ष स्वरूपात शिकविण्यात आली.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रसाद कुलकर्णी व प्रा. एच. एस. देशपांडे हे होते.
या सर्व व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्ससाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे तसेच उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व मोलाचे पाठबळ लाभले.
हे व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्स विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण, उद्योगसुसंगत कौशल्ये व व्यावहारिक अनुभव प्रदान करणारे ठरले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी अधिक रोजगारक्षम, आत्मविश्वासपूर्ण व भविष्यासाठी सज्ज अभियंते म्हणून घडतात, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

