पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी प्रणिताताई भालके यांची निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पंढरपूर यांच्यावतीने प्रणिता ताई भालके यांचा सत्कार जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये व तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांच्या हस्ते अभिनंदनाचे पत्र व हार शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य देशपातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत काम कसे चालते याबाबत माहिती देण्यात आली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तर नगराध्यक्ष प्रणिताताई भालके यांनीही ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या कार्यकाळात पंढरपूर शहरवासीयांना मूलभूत सेवा व प्रशासकीय सेवा सुलभ व चांगल्या दर्जाच्या मिळतील ही अपेक्षा व्यक्त केली तसेच पंढरपूर शहराचा आपल्या काळात नियोजनबद्ध विकास व्होवो ही सदिच्छा देण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका कोषाध्यक्ष सागर शिंदे, तालुका सदस्य सतीश निपाणकर ,श्रीराम साळुंखे उपस्थित होते.

