पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कोर्टी -पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय व तृतीय वर्ष बी. टेक. विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम ऑन पायथॉन प्रोग्रामिंग व पी ल सी ऍण्ड स्काडा फॉर इंडस्ट्रियल ऑटोमेशन्स उत्साहात संपन्न झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे सर यांनी दिली . हा कार्यक्रम ०२ जानेवारी २०२६ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून, कॉम्प्युटर सायन्स व इंजिनीरिंग चे विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग चे विभाग प्रमुख व आय. ई. ई. ई. ब्रांच काउंसलर डॉ. के. शिवशंकर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून श्री. इर्शाद अली द वर्ल्ड ऑफ ऑटोमॅशन पुणे व मिस. मधुरा भिडे नामजोशी टेकनोलर्न सॉफटेक प्रा. लि. पुणे उपस्थित होते
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री. डी. एम. कोरके, श्री. ए. एन. गोडसे, श्री. एन. व्ही खांडेकर, सौ सोनाली घोडके, श्री. व्ही. पी. मोरे यांनी काम पाहिले.
या पाच दिवसीय कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पायथॉन प्रोग्रामिंग तसेच पी ल सी ऍण्ड स्काडा फॉर इंडस्ट्रियल ऑटोमेशन्स तंत्रज्ञानाची सखोल माहिती, प्रात्यक्षिक अनुभव व प्रकल्पाधारित कौशल्ये आत्मसात करून देणे हा होता. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध ज्ञान मिळून त्यांची रोजगारक्षमतेत नक्कीच भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

