पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरच्या अध्यक्षपदी सतीश बागल, कार्याध्यक्षपदी शहाजी काळे यांची निवड करण्यात आली आहे.
सोमवार दि. ०५ जानेवारी रोजी मावळते अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. इतर पदाधिकार्यांमध्ये उपाध्यक्षपदी घनश्याम शिंदे, सचिवपदी बजरंग नागणे, सहसचिवपदी कल्याण कुसूमडे, खजिनदार महालिंग दुधाळे, सहखजिनदारपदी मोहन कोळी यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, शिवाजीराव शिंदे, नवनाथ पोरे, मोहन डावरे, समाधान गायकवाड, अरूण बाबर, सुधाकर कवडे, सुनिल कोरके, सचिन शिंदे, श्रीनिवास शिंदे, उत्तम बागल आदी उपस्थित होते.

