पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल उमेश मारुती पोरे यांचा पंढरपूर मार्केट यार्ड येथील संपर्क कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. नागेश फाटे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
एका जबाबदार पदावर निवड झाल्याबद्दल उमेश पोरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभाला विष्णू पवार, अरुण पाटील, दत्तात्रेय पोरे, नवनाथ बचूटे यांसह इतर मान्यवर आणि मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थित सर्वांनी उमेश पोरे यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना उमेश पोरे यांनी सर्वांचे आभार मानले आणि आपल्या पदाच्या माध्यमातून जनसेवेचा वसा पुढे नेणार असल्याचे सांगितले.

