म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
जनश्री फाउंडेशन, म्हसवड यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रकाशन सोहळ्याला जनश्री फाउंडेशन अध्यक्ष इंजि सुनील पोरे,बीजेपी युवा मोर्चाचे चिन्मय कुलकर्णी, लाडक्या बहिणीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पुकले, डॉ.प्रमोद गावडे,ऍड.नानासाहेब कलढोणे, बाळासाहेब पिसे, करण भैय्या पोरे, ऍड. शुभम पोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. जयकुमार गोरे यांनी जनश्री फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी फाउंडेशन करत असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. समाजोपयोगी उपक्रम, जनजागृती व सेवाभावी दृष्टिकोनातून प्रकाशित करण्यात आलेली ही दिनदर्शिका समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी फाउंडेशनच्या भावी उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रकाशन सोहळ्यास जनश्री फाउंडेशनचे सदस्य, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

