भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गाव भेट दौऱ्यादरमान तेज न्यूज परिवाराला सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार पाटील यांनी तेज न्यूजच्या कार्याचे कौतुक करत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.
आमदार अभिजीत आबा पाटील म्हणाले, नावाप्रमाणेच तेज न्यूजच्या बातम्या समाजात वेगाने पोहोचतात. ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय तसेच जनतेचे वास्तव मांडण्यात तेज न्यूज वेगळेपण जपत आहे.” अशा शब्दांत त्यांनी तेज न्यूजच्या पत्रकारितेचे कौतुक केले. आमदार अभिजीत आबा पाटील यांनी तेज न्यूजच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व माध्यमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवावे, असे मत व्यक्त केले.
या भेटीदरम्यान आमदार अभिजीत आबा पाटील यांचा शाल, श्रीफळ व दिनदर्शिका देऊन सत्कार तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विठ्ठलचे संचालक धनंजय काळे, साहेबराव जगदाळे प्रसिद्ध उद्योजक सद्दाम सय्यद, नागेश पाटील ,नितीन सरडे ,शुभम बोबडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी तेज न्यूज परिवाराच्या वतीने माळवदे आभार प्रदर्शन केले.


