निमगाव प्रतिनिधी तेज न्यूज
ओंकार शुगरची १५ ङिंसेबर पर्यंतची ऊस बीले 30५0 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत.अशी माहिती चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी तेज न्यूजला दिली आहे.
ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील, प्रशांत बोञे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने अनेक अङचणीवर मात करीत चालु केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचे गाळप होणार हा विश्वास निर्माण केला आहे .
चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी ऊसगाळपाचा शुभारंभ करताना ज्या त्या भागाप्रमाणे उच्चांकी दर दराची परंपरा चालु ठेवली जाईल आशी ग्वाही दिली होती.त्या प्रमाणे १५ नोव्हेबर पर्यंत ची ऊस बीले या अगोदर अदा केली होती. १५ ङिंसेबर पर्यत ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर ३०५० जमा झाली आहेत.
कारखाना बंद असल्यानंतर ऊस गाळपाची समस्या निर्माण होते काबाडकष्ट करून जोपासलेले ऊसाचे गाळप वेळेत होणे गरजेचे आहे हे काम बोञे पाटील यांनी केले.
आप्पासाहेब नाईकनवरे
पट. कुरोली ऊस उत्पादक शेतकरी

