मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
12 जानेवारी 2026.. राज्यकला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षांमध्ये एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये गांधी बाल मंदिर हायस्कूल, कुर्ला.. या शाळेने घवघवीत यश संपादन करत, उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या दोन्ही परीक्षांचा निकाल 100% टक्के लागला असून, मुख्याध्यापक , पर्यवेक्षक,संचालक आणि सर्व शिक्षक वर्ग त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त , अधिक थांबून घेण्यात येणाऱ्या अधिकच्या तासिका, तसेच विद्यार्थ्यांनी केलेला सातत्यपूर्ण सराव ,पालकांचे सहकार्य, कलाशिक्षक श्री . रत्नकांत विचारे सर आणि श्री. विश्वनाथ पांचाळ सर यांचे अचूक मार्गदर्शन, पर्यवेक्षक श्री. खोंडे सर आणि मुख्याध्यापक श्री. अनिल पांचाळ सर यांचे सहकार्य., यामुळेच हे उज्वल यश सर्व विद्यार्थी प्राप्त करू शकले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव सौ. साटेलकर मॅडम मुख्याध्यापक श्री. अनिल पांचाळ सर पर्यवेक्षक श्री. रवींद्र खोंडे सर व संस्थेचे अन्य पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

