पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे व एस. एम. जोशी सोशल फौंडेशन सभागृह पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 मध्ये शहीद मेजर कुणाल गोसावी अंधशाळा पंढरपूरच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शोभा भारत माळवे आणि शुभांगी दहीवाळ कवयित्री पंढरपूर यांची फेस्टिवल मध्ये काव्य सादर करण्यासाठी निवड झाली आहे.
फुले प्रेमी व संविधान दूत विजय वडवेराव आयोजक- भिडेवाडा, देशातील मुलींची पहिली शाळा, आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान फुले फेस्टिवल 2026 यांनी तसे निवड पत्र प्रदान केले आहे.अशी माहिती कवयित्री शोभा माळवे यांनी तेज न्यूजला दिली आहे.
फुले फेस्टिवल मध्ये कविता सादर करण्यास मिळाल्याबद्दल पंढरपूर परिसरातील साहित्य प्रेमी, कवी यांच्याकडून शोभा माळवे व शुभांगी दहिवाळ यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.

