पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नव्याने सुरू झालेल्या पंढरपूर -हैद्राबाद- तिरुपती साप्ताहिक रेल्वेगाडीस अखिल भारतीय ग्राहक पंचायती सोलापूर जिल्हा व पंढरपूरतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य विनोद भरते,अ. भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, उपाध्यक्ष विनय उपाध्ये,पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सहसचिव आझाद अल्लापूरकर, सदस्य सतिश निपाणकर, विनोद शेंडगे,प्रशांत काकडे,स्थानिक सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य सुरेश लाड,स्टेशन प्रबंधक के के मिश्रा,चनगौडर,वाणिज्य प्रमुख अमोल जोशी,रेल्वे चालक सुब्रत गांगुली, सत्येंद्र प्रसाद,तिकीट निरिक्षक व प्रवासी उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे रेल्वेचे पूजन करून रेल्वेच्या चालक, स्टेशन प्रबंधक, व इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदरची रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू राहावी अशी रेल्वे प्रवाशांकडून मागणी केली जात आहे.

