पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या आरोग्य सुधारून विद्यार्थ्यांना आनंद मिळावा व त्यांची कौशल्य विकसित होण्याच्या दृष्टीने श्री. रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शनाखाली मातोश्री ईश्वरांम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर या प्रशालेत " क्रीडा सप्ताहाचे " आयोजन केले आहे. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रशालेचा माजी विद्यार्थी शंकर कदम व संस्थेच्या संचालिका सुप्रियाताई पवार यांचे शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. सुप्रियाताई पवार म्हणाले की खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक कार्य व चिकाटी यासारख्या गुणांची वाढ होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व शरीराचा व्यायाम होऊन त्यांच्यामध्ये चपळता व सहनशक्ती वाढीस लागत असल्याचे सांगून मुलांनी अभ्यासाबरोबर खेळातही नैपुण्य वाढविण्याचे आवाहन केले.
तर पुढे मार्गदर्शन करताना प्राचार्य सौ.नंदिनी गायकवाड म्हणाल्या की खेळातून विद्यार्थ्यांना आनंद घेऊन आपला शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकास करण्याचे आवाहन केले. तर विद्यार्थ्यांनी खेळातील नियमांचे पालन करून खिलाडू वरती जोपासावी असे सांगितले. पाहुणे शंकर कदम म्हणाले की या प्रशालेत घेतलेल्या खिलाडवृत्तीचा मला आयुष्यात खूप फायदा झाला असे सांगून शिक्षकांच्या बद्दल असलेली तळमळ व कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या की शिक्षक हाच विद्यार्थी जीवनातील प्रमुख गुरु आहे असे सांगितले.
या क्रीडा सप्ताहात फणि गेम्स, थाळीफेक , गोळा फेक रस्सीखेच इत्यादी खेळ होणार असल्याचे क्रीडा शिक्षिका कुमुदिनी सरदार यांनी सांगितले. तर फनी गेम्स मध्ये महिला पालक वर्गाने विशेष उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.या यशस्वी महिलांना गुलाबाची रोपे देऊन त्यांचा गुणगौरव केला.
या कार्यक्रमासाठी यांचे सह पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश डुबल यांनी केले.तर प्रास्ताविक कुमुदिनी सरदार यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इरफान शेख ,अभिजीत कोष्टी,प्रमोद खिलारे, स्वाती कोळेकर, पुंजाजी ढोले. यांच्यासह विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

