भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी प्रशालेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आष्टी ता मोहोळ येथे आयोजित सिल्व्हरओक मॅरेथाॅन स्पर्धेत क्रिडाशिक्षिका पी.पी.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदवला होता.यामध्ये
१) अर्जुन दिनेश इंगोले
२) शुभम प्रदिप पवार
३) आर्यन विनोद शिंदे
४) रूद्र संदिप दिवटे
५) रूद्र आण्णासो घाडगे
तसेच प्रशालेतील सहशिक्षिका पी.पी.काळे मॅडम यांचा मुलगा शिव अतुल जाधव यांने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत रोख बक्षीस २००० रूपये व मानचिन्ह मिळवले.याबद्दल प्रशालेच्या वतीने सर्व सहभागी झालेले विद्यार्थ्यांचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
तसेच प्रशालेचे सचिव एच.आर.जमदाडे,प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


