भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.माता पालक मेळाव्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून पंढरपूर येथील डॉ.वैभवी पंकज भोसले उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपप्राचार्या पी आर मोरे होत्या. तर पालक संघाच्या उपाध्यक्ष प्राची माळवदे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ.भोसले म्हणाल्या की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचा आहार व आरोग्य सुदृढ असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मोबाईलचा विद्यार्थ्यांवर होणारा दुष्परिणाम व त्यामध्ये असणारी पालकांची जबाबदारीची भूमिका या विषयावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पुढे बोलताना डॉ .भोसले म्हणाल्या की मुलं ही पालकांच अनुकरण करत असतात. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श घालून दिला पाहिजे.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक के डी शिंदे यांनी मुलांना मोबाईल पासून जितके दूर राहता येईल तितके राहण्याचा प्रयत्न करा असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक बेसिकराव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.पी.कदम यांनी केले पाहुण्यांचा परिचय एन.बी.विधाते यांनी करून दिला.माता पालक संघाच्या प्रमुख एम.के. भोसले व सर्व महिला शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिंगे एस.एच. व नागणे एम.एस. यांनी केले. नागटिळक यू.व्ही. यांनी आभार मानले.यावेळी मोठ्या प्रमाणात माता पालक उपस्थित होत्या.

