शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
मागील 10 ते 15 दिवसांपासून जागृत ऊस उत्पादक शेतकरी पुत्रांनी केलेल्या एल्गारामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जाहीर केलेले ऊस दर बदलावे लागले आणि या आंदोलनात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावून तब्बल 6 दिवस उपोषणासाठी बसलेले शेतकरी चळवळीतील भीष्माचार्य समाधान फाटे,बाळासाहेब जगदाळे,राहुल पवार,गणेश लामकाने तसेच या उपोषणकर्त्यांचा आवाज पडद्यामागील कार्यकर्ते श्रीनिवास नागणे यांच्या सह उपस्थित शहाजी जगदाळे,शिवराम गायकवाड,सिराज तांबोळी यांचा जाहीर सन्मान आज सनराईज परिवाराच्या वतीने करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी शेळवे, खेडभाळवणी,भंडीशेगाव,वाखरी, पिराची कुरोली,वाडीकुरोली,पटवर्धन कुरोली,देवडे,कौठाळी,उपरी,गादेगाव येथील असंख्य ऊस उत्पादक शेतकरी तसेच माता भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ही प्रशाला नेहमीच आपल्या अनोख्या उपक्रमामुळे चर्चेत असते,तसेच या प्रशालेत विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा तसेचा, दिलेल्या संवैधानिक मार्गाचा उपयोग विद्यार्थि नेहमीच करत असतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी बऱ्याच वेळा आंदोलने, मोर्चे,निदर्शने इत्यादी मार्गाचा तसेच गांधीगिरी मार्गाचा उपयोग केलेला आहे.चळवळीतील ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत यासाठी प्रशाला नेहमीच प्रयत्न करत असते. आपल्या मागण्या संवैधानिक पद्धतीने मांडल्यानंतर कशा प्रकारे यश मिळतं हे दाखवण्यासाठी आज प्रशालेत पालक मीटिंग बरोबर शेतकरी संघर्ष योद्धांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.
त्यामध्ये शेतकरी चळवळीचे प्रणेते समाधान फाटे यांनी आपण चळवळीतून कसे घडलो,आपल्या चळवळीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा फायदा झाला आणि यापुढे चळवळ वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे,विद्यार्थी दशेतूनच कशा पद्धतीने चळवळ पुढे घेऊन जाता येईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले,श्रीनिवास नागणे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी दशेत सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे,चळवळ वाढीसाठी जे कार्य करत आहे ते उल्लेखनीय आहे.ज्या पद्धतीचे संस्कार येथील शिक्षकांवर आहेत,संस्थेवर आहेत तेच विद्यार्थ्यांमध्ये उतरत आहेत हे दिसून येत आहे, हे या निमित्ताने सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून आपल्या रास्त मागणीसाठी चळवळ उभा करणे,सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमातून व्यक्त होणे,गरज पडल्यास रस्त्यावरची लढाई लढणे, यात काहीही गैर नाही हे सांगितले, तसेच चळवळीचे बिजारोपण हे विद्यार्थी दशेतूनच होते हे स्पष्टपणे जाहीर केले,आज घरी बसून कोणाला काहीही मिळणार नाही आपल्या न्याय्य हक्कासाठी संविधानाने दिलेल्या शस्त्राचा वापर केला तरच आपल्याला न्याय मिळेल हे ही आवर्जून सांगितले.
तसेच संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी चळवळीचे धार बळकट करण्यासाठी स्वरचित कविता म्हणत उपस्थित सर्वांचीच मने जिंकली,प्रशालेसाठी नेहमीच सर्वार्थाने सहकार्य करणारे आमचे सहकारी मित्र युवा उद्योजक तसेच पंढरपूर तालुक्याचे नेते तानाजी सालविठ्ठल यांनी ऐनवेळी आपल्या प्रशालेस 25 हजार रुपयांची साउंड सिस्टम देण्याचे जाहीर केले व तात्काळ ₹ 25 हजाराचा चेक संस्थेचे पदाधिकारी यांना सुपूर्द केला,कार्यक्रमाची संपूर्ण तयारी व उत्तम नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे सर यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी शेळवे गावचे उपसरपंच रामचंद्र दिगंबर गाजरे,मा.उपसरपंच किरण देवचंद गाजरे,ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य बाळासाहेब गाजरे,शेळवे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मोहन काका लोकरे,आमचे गुरुवर्य शेळवे कृषि विद्यालयचे मा.प्राचार्य महादेव लिंगडे,ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य डॉक्टर शशिकांत नागटिळक, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ गाजरे ज्येष्ठ नेते विठ्ठल आप्पा गाजरे,युवा नेते रामदास गाजरे,संतोष भालचंद्र गाजरे,समाधान भैय्या गाजरे,संतोष आत्माराम गाजरे,कौठाळी गावचे प्रशांत नागटिळक, समाधान पवार, सोमनाथ गाजरे,जावेदभाई मुलानी,संभाजी ब्रिगेडचे प्रकाश तात्या गाजरे,निखिल आसबे, दादासाहेब आसबे,बाळासाहेब गाजरे, सोमनाथ गाजरे, तुकाराम निवृत्ती गाजरे,रोहन गाजरे,अजित सत्यवान गाजरे,गोपाळ गाजरे,प्रमोद गाजरे, बबन लोकर,पिराची कुरोली चे शंकर शिंदे,भंडीशेगावचे भैरवनाथ जाधव, अमित पवार,संदीप यलमर,पवन पाटील, डॉ.गणेश गाजरे,सुशांत गाजरे,देवडे गावचे महादेव शिंदे,रोहित चव्हाण यासह अनेक पालक व माता भगिनी आवर्जून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक मोहन गायकवाड यांनी केले,तर मनमोहक स्वागत गीताची तयारी संगीत शिक्षक योगेश गायकवाड यांनी केली,सर्व शिक्षक स्टाफ,कर्मचारी यांनी कार्यक्रम सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी अथक परिश्रम केले.
चहापाणी आणि अल्पपोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



