इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यक्रम अंतर्गत PRA तंत्राचा वापर करून गावाचा सविस्तर नकाशा तयार करून ग्रामस्थांसमोर मांडला.या नकाशात गावाची भौगोलिक ओळख,शेतजमिनीचे प्रकार, पाण्याचे स्रोत,आणि रस्ते यांचा समावेश होता.गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि माहितीचा वापर भविष्यात विकास आराखडा तयार करण्यासाठी होईल असे मत व्यक्त केले.
या वेळी कृषीकन्या साक्षी बोराटे, सुनैना जाधव,कीर्ती कोळी, प्रतीक्षा जाधव, श्रद्धा जाधव, अनामिका कोळेकर,प्राची कोंडलकर श्रद्धा इंगोले , यांनी सहभाग नोंदवला .कार्यक्रमास प्राचार्य आर. जी. नलावडे. प्रा .एस. एम .एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक व विषय मार्गदर्शक) व प्रा.एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा .एच. वी .खराडे (कार्यक्रम अधिकारी )यांचे मार्गदर्शन लाभले .

