पुणे प्रतिनिधी अमोल शहारे
महाराष्ट्र ख्रिस्ती संघाच्या वतीने ख्रिसमस महोत्सव मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये रेव्ह डॉ. एम. डी. बोर्डे (मुंबई) यांच्या हस्ते केक कापून उपस्थित मान्यवरांना आशीर्वाद देण्यात आला.
कार्यक्रमात प्रभू येशूचे गुणगान करण्यात आले. प्रभू येशू यांनी त्यागाचा आणि सत्याचा मार्ग अवलंबून सर्व जगातील नागरिकांना शांतता आणि प्रेम ठेवण्याचे वचन देण्याचे रेव्ह. बोर्डे यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रभू येशूवर आधारित गाणे म्हणून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण करण्यात आले. कार्यक्रमात रेव्ह. बोर्डे यांच्या हस्ते केक कापून सर्व उपस्थितितांना केकचे वाटप करण्यात आले.
यावेळी आनंद छाजेड, विनोद रणपिसे, परशुराम वाडेकर, वसुंधरा निरभवणे, डॉ. विजय ढोबळे, अविनाश कांबळे, सनी निम्हण, विजय ढोणे, गणेश पवळे, विजय जाधव, केतन गायकवाड, ॲड. नंदलाल धिवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुरेश ससाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निलेश वाघमारे, मंगेश रूपटक्के, अमित जावीर यांनी परिश्रम घेतले.

