भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आज दिनांक २७/१२/२०२५ रोजी शालेय बाजार घेण्यात आला.
या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय केसकर आणि सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
केसकरवाडी गावचे सरपंच प्रकाश केसकर, विकास सोसायटीचे चेअरमन संजय मासाळ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग अतिशय चांगला दिसून आला गावातील सर्व ग्रामस्थ यांनी शालेय बाजारामध्ये अनेक वस्तू खरेदी केल्या. शेवटी मुख्याध्यापक लोखंडे यांनी उपस्थित सर्व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

