अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
या नामांकित पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुभहस्ते उद्घाटन रेणू गावस्कर,अध्यक्ष – एकलव्य न्याय, पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.तसेच या कार्यक्रमास रघुनाथ पांढरे गटविकास अधिकारी,पंचायत समिती माळशिरस आणि सुषमा महामुनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, माळशिरस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उद्या रविवार दि.28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता, स्थळ उदय सभागृह, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना, शंकर नगर-अकलूज येथे आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्र निर्माण पुरस्कार प्राप्त शिक्षक संग्राम दळवी जिल्हा परिषद शाळा, नेवरे,भाऊसो देशमुख जिल्हा परिषद शाळा, तुपे वस्ती , नितीन पाटील जिल्हा परिषद शाळा, तरंगफळ , रेवण भोसले जिल्हा परिषद शाळा, गोरडवाडी , शिवाजी पारधी जिल्हा परिषद शाळा, कारूंडे , अवंती सिंदफळकर जिल्हा परिषद शाळा, पिसेवाडी या शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या शिक्षकांचा सन्मान करणारा हा सोहळा रोटरीच्या सेवाभावाचे, शिक्षणमूल्यांचे व सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे.
तरी आपण रोटरी क्लब, अकलूज आयोजित राष्ट्र निर्माण पुरस्कार वितरण सोहळा या गौरवशाली व प्रेरणादायी कार्यक्रमाला वेळेवर व आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आग्रहाची विनंती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रो.ॲड प्रवीण कारंडे प्रकल्प प्रमुख,रो. स्वराज फडे संचालक,रो. अजिंक्य जाधव सचिव,रो. केतन बोरावके अध्यक्ष रोटरी क्लब अकलूज यांनी केले आहे.

