महाराष्ट्रातील ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकारांच्या उपस्थितीने मिळणार करकंबकरांना अध्यात्मिक मेजवानी
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे समस्त करकंब कोष्टी समाज बांधवांच्या वतीने आणि करकंबकरांना उत्सुकता लागून रिहिलेला प्रतिवर्षाप्रमाणे २४ वा नारदीय कीर्तन महोत्सव दिनांक २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे.
त्यामध्ये दररोज पहाटे ६:०० वा.काकडारती ८:०० वा देवांग पुराण पारायण.आणि महिलांचे भजन आणि सायं आरती होणार असून दररोज रात्री ८:०० ते १० यावेळेत रविवार २८ डिसेंबर रोजी ज्ञानेशबुवा धानोरकर पुणे सोमवार २९ डिसेंबर रोजी प्रभंजन बुवा भगत शिर्डी मंगळवार ३० डिसेंबर रोजी वेदश्री ओक मुंबई बुधवार ३१ डिसेंबर रोजी लक्ष्मी प्रसाद पटवारी पुणे गुरुवार १ जानेवारी संदीप बुवा मांडके तर शुक्रवार २ जानेवारी कैलास बुवा खरे यांचे श्रवणीय नारदीय कीर्तन संपन्न होणार असून त्यांना तितकीच सुंदर साथसंगत हार्मोनियम गंगाधर देव तबला ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे करणार आहे.
सदर हे या महोत्सवाचे २४ वे वर्ष असून सर्व करकंबकर रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.
तसेच शनिवार ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ :००वाजता श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून या संपूर्ण महोत्सवास सर्व समाज बांधवांनी आणि आई चौंडेश्वरी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कोष्टी समाज बांधव अधिक परिश्रम घेत आहेत.

