सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून अनेक घडामोडी घडत आहेत .रोज वेगवेगळ्या पक्षात उमेदवार प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांनी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हाप्रमुख अजय दासरी जिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण माजी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव , दत्ता गणेशकर, भैय्या धाराशिवकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी अल्काताई राठोड यांना शिवबंधन बांधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अस्मिता गायकवाड व अलका राठोड या एकाच वेळी महापालिकेत सदस्य झाल्या होत्या.अस्मिता गायकवाड यांनी विरोधी बाकावर राहून शिवसेनेचा आवाज कायम राखला तर अलका राठोड यांनी कॉग्रेस मधून महापौर पदावर राहून दमदार कामगिरी केली होती... यावेळी अस्मिता गायकवाड व अलका राठोड यांनी एकमेकीना आलिंगन देत जुन्या मैत्रीला उजाळा दिला.
अलका राठोड ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा तून मशाल या चिन्हावर प्रभाग २३ मधून नीवडणुक रिंगणात उतरणार आहेत..त्याचे सोबत माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव हे असणार आहेत.त्याचे पक्ष प्रवेशाने ह्या प्रभागात मशालीसह महाविकास आघाडीचा आवाज वाढला आहे.
यावेळी अस्मिता गायकवाड, अजय दासरी , संतोष पाटील लक्ष्मण जाधव यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
अलका राठोड यांनी देखील आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यानी मुख्यमंत्री पदी असताना केलेली कामगिरी यावर विश्वास ठेऊन व प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला आहे..आपण पक्षशिस्त पाळून काम करु व निवडणूकीत यश संपादित करू असे सांगितले.

