मुंबईचा महापौर मराठीच !
येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर आपला झेंडा फडकविण्यासाठी सत्ताधारी भाजपा सरसावली असली तरी दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येत असल्याने एकगठ्ठा मराठी मते त्यांच्याकडे जाण्याची भीती भाजपला आहे.मध्यंतरी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हिंदू महापौर होईल सांगून फक्त आणि फक्त मराठीच माणूस महापौर होईल याला फाटा दिला होता.तेव्हा हिंदू महापौर होईल म्हणजे केवळ मराठी असा त्याचा अर्थ नव्हता.मागील २५ वर्षापासून पालिकेवर उद्धव ठाकरेंचे वर्चस्व असून २०१७ च्या निवडणुकीत त्यांचे भाजपा पेक्षा चार पाच नगरसेवक जास्त निवडून आले होते.तेव्हा भाजपने सत्तेत न येता आम्ही चौकीदार म्हणून काम पाहू यासाठी माघार घेतली.आता भाजपला कधी एकदाची मुंबई आपल्या ताब्यात येते याचे वैध लागलं लागले आहेत.भाजपमध्ये गुजराथी, मराठी, उत्तर भारतीय यांच्याप्रमाणेच अन्य राज्यातील नागरिकांना देखील उमेदवारी देण्यात येते.गेल्या निवडणुकीत ५० टक्के ४० परप्रांतीय नगरसेवक निवडून आले होते.यावेळी देखील परप्रांतीय पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त उमेदवारी भाजप देऊ शकते.त्यामुळे मुंबईचा महापौर अमराठी झाला तर नवल वाटायला नको असे जाणकारांचे मत आहे.काहीही झाले आणि कोणताही पक्ष सत्तेत आला तरी महापौर हा मराठीच असायला हवा असे मराठी माणसांचे मत आहे.
गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व


