मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी त्यांची यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी फाटे यांनी पवार साहेबांना श्री पांडुरंगाची मूर्ती देऊन त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला आणि त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाचे आणि अनुभवी नेते उपस्थित होते, ज्यामुळे या कार्यक्रमाला पक्षीय पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले. ह्या वेळी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे , युगेंद्र दादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील , माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, रोहिणीताई खडसे, मेहबूब शेख,सुनील गव्हाणे,जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शुभम फाटे, यांच्या सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
यावेळी नागेश फाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योग विभागाच्या वतीने शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. व्यापार व उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी पक्ष नेहमीच कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उपस्थित सर्व नेत्यांनीही आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी कामना केली.



