पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्रोफेसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख व खिलारवाडी चे सुपुत्र डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या शरद पवार आणि पुलोद चा प्रयोग या पीएच.डी.च्या प्रबंधाचे पुस्तक रूपामध्ये प्रकाशन सोहळा उद्या दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्ताने सकाळी १०.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न होणार आहे.
तरी हा कार्यक्रम सोहळा मा. आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. तरी प्रकाशन कार्यक्रम सोहळ्यास आवर्जून हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रोफेसर. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले आहे.


