भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे शाळा व्यवस्थापन समिती ची पुनर्रचना करण्यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संजय मासाळ हे होते. त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य तानाजी केसकर उपस्थित होते.
मागील शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते या पालक मेळाव्यामध्ये उपस्थित पालकांनी सर्वानुमते सदस्य निवड केली या सदस्य निवडीला सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
निवड करण्यात आलेल्या सर्व सदस्यांमधून अध्यक्ष पदी दत्तात्रय मारुती केसकर आणि उपाध्यक्ष पदी विठ्ठल ईश्वरा मासाळ यांची निवड करण्यात आली .
नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. माजी शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे उपशिक्षक मस्के सर व माने सर यांनी या सभेची धुरा सांभाळली आणि शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.


