सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
तब्बल दोन तास वेळ दिले व सोलापूरच्या हुरडा पार्टी टीम व शेतकरी सोबत संवाद साधले हुरडा महोत्सव साठी सहकार्य करू म्हणाले
मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात सुयोग पत्रकार निवास फॅमिली कोर्ट येथे अस्सल सोलापुरी हुरडा पार्टीचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष,विधानपरिषद सभापती राम शिंदे,विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे, चंद्रकांत दादा पाटील,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राहुल नार्वेकर, पंकजा मुंडे, मा. खा. विजय दर्डा,भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, निलेश राणे,सर्व आमदार,सचिव,शासकीय अधिकारी,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी अस्सल सोलापुरी हुरडा व सोलापुरी स्पेशल जेवण मेजवानी देण्यात आली होती .
यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर हुरडा चटणी भाकरी व बोर स्वीकारून सोलापूरच्या टीम चे कौतुक केले.
हुरडा प्रेमी व युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणारे दिलदार नेते,कौशल्य विकास विभागाला जागतिक स्थरावर नेण्यासाठी विविध विधायक उपक्रम राबविणारे ॲक्टिव मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या तर्फे अस्सल. सोलापुरी हुरडा पार्टी व सोलापुरी स्पेशल चुलीवरचे गावरान पारंपरिक लिंगायत पद्धतीचे सात्विक जेवण आयोजन मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 वेळ सायं 5 ते 10 स्थळ फॅमिली कोर्ट पत्रकार भवन नागपूर आयोजन करण्यात आले होते.
सोलापुरी जगात भारी
हुरडा पार्टी मधील विविध स्पेशल मेनू अस्सल सोलापुरी हुरडा गूळभेंडी,फुले मधुर,सुरती,कूचकुची,गावरान मेवा सोलापुरी शेंगा चटणी,स्पेशल मका चिवडा,फरसाण,सोलापुरी स्पेशल ज्वारी बिस्कीट,नाचणी बिस्कीट, मिलेट कुकीज,शेव,सेंद्रिय गूळ,गावरान मेवा बोर,मका,गावरान पेरू,राजा राणी चटणी,भरली वांगी, पेढा,ताक,सोलापूरचे विविध फळ लिंगायत पद्धतीचे चुलीवरचे जेवण स्पेशल मेनू सोलापूरची स्पेशल हुगि खीर शेंगा पोळीकाकवी,धपाटे,चुलीवरच्या गरम व कडक भाकरी,ज्वारी,बाजरी,मका,नाचणी, मीलेट रोटी,हिरवी मिरची ठेचा,दही चटणी,बेसन पिटला, पेंडपाला,सोलापुरी रान भाजी तांदूळसा,राजगिरा,हरभरा, चिघळ,करडई,करंज्या,वांगी भरीत,स्पेशल चटणी जवस चटणी, कारळ चटणी,लोणच स्पेशल लिंबू लोणचे,कैरी लोणच,मिरची लोणच,आवळा लोणच, आदि विविध प्रकारचे खाद्य पदार्थ ठेवण्यात आले होते.
ब्रँड सोलापुरी जगात भारी हुरडा पार्टी व्यवस्थापक काशीनाथ व संगीता भतगुणकी ड्रीम फाउंडेशन मो.7219099955 संयोजन सहकार्य सौ गजराबाई,श्री गुरूषांत,श्री परमेश्वर भतगुणकी व टीम ड्रीम फाउंडेशन,बसव संगम शेतकरी गट संपर्क.मो 9890948388 या बाबतीत अधिक माहिती करिता संपर्क साधा.



