पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हिजन तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICICVT-2025)( आयसीआयसीव्हीटी-२०२५) दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी सांगितले.
महाविद्यालयाने ‘NAAC A+’(नॅक अ+)तसेच ‘NBA’( एन बी ए) मानांकन प्राप्त केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्याची परंपरा कायम राखली आहे. परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन व्हिजन, इंटेलिजेंट कम्प्युटिंग, ऑप्टिमाईज्ड कम्प्युटेशनल इंटेलिजन्स, डिस्क्रिट गणित आणि क्रिप्टोग्राफी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांवर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही प्राचार्य डॉ. कैलास जगन्नाथ करांडे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर, उप-कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा, डॉ.पी एन कोळेकर(समन्वयक पीएम-उषा) व जागतिक स्तरावरील मान्यवर संशोधक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रा. (डॉ.) पास्टर आर. आर्ग्युएलेस (फिलिपिन्स), डॉ. के. एम. एस. वाय. कोनारा (श्रीलंका), डॉ. अनिल औदुंबर पिसे (दक्षिण आफ्रिका), डॉ. परिक्षित महाल्ले (पुणे,) आणि डॉ. सुमन लता त्रिपाठी ( पुणे) यांचा समावेश आहे.
देश-विदेशातील १०० पेक्षा अधिक तज्ज्ञ या परिषदेत आपल्या संशोधन निबंधांचे सादरीकरण करणार आहेत. फिलिपिन्स, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका तसेच भारत येथून संशोधन निबंध प्राप्त झाले असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, परिषदेचे संयोजक डॉ. ए. ओ. मुलाणी आणि प्रा. एन. एम. सावंत यांनी दिली.
सदर परिषदेस प्राप्त होणारे शोधनिबंध स्कोपस नियतकालिका मध्ये प्रकाशित होण्याची संधी मिळणार असून ही गुणवत्तेच्या दृष्टीने एक उल्लेखनीय बाब आहे.
या परिषदेला सायटप्रेस, पोर्तुगाल यांचे प्रकाशन समर्थन लाभले असून संशोधन प्रकाशित करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे, असेही डॉ. ए. ओ.मुलाणी व प्रा.एन. एम. सावंत यांनी सांगितले.
परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. आर. एस. मेंथे (संचालक, स्कूल ऑफ कॉम्पिटिशनल सायन्सेस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) आणि डॉ. एस. डी. राऊत हे परिषद संयोजक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच डॉ. एस. जी. देशमुख, डॉ. बी. बी. गोडबोले, डॉ. एस. व्ही. पिंगळे, प्रा. एस. जी. लिंगे आणि प्रा. एस. आर. टाकळे यांचे विशेष योगदान लाभणार आहे.
ही आंतरराष्ट्रीय परिषद प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.


