सोलापुर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत.. लवकरच निवडणुका घोषित होतील अशा स्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याबाबत सकारात्मक आहे.
वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय लवकरच घेतील.त्या अनुषंगाने पूर्व भागात आपली ताकद आपणाला दाखवावी लागेल.. पूर्व भाग शिवसेनेचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला आहे.
यातील प्रभाग क्रं.9,10,11,12 या ठिकाणी पक्षाचा मतदार निश्चित ठरलेला आहे.. त्यामुळे पुन्हा एकदा आपणाला शिवसेना प्रमुखांच्या दिव्यत्वाची मशाल पेटवायची आहे.. आपापसातील हेवे दावे बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुखांचे विचार ,मा.पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्रीपदी असताना सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम, संयमी व आश्वासक चेहरा म्हणून आपणाला या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी योग्य नियोजन, प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क, संबंधित भागातील प्रश्नाची माहिती, त्यावरील उपाय शोधून जनहितासाठी आपणाला ही लढाई शांततेत लढून क्रांती घडवायची आहे.
यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहूया असे आवहान ॲड .सुरेश (बापु) गायकवाड (जिल्हाध्यक्ष शिवा विधि न्याय केला सोलापूर) यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मित्रानी केले आहे . ओंकार पार्क ,शनि मंदिर कर्णिक नगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला .
कार्यक्रमाची सुरुवात जागृत शनैश्वराची महाआरती करू करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे व शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मतदार यादी निरीक्षण व वाचन यावर विशेष भर देण्यात आला. शिवाय निवडणूकीतील जबाबदारीच्या वाटपावर चर्चा करण्यात आली
यावेळी छत्रपती केने, अशोक ठोंगे पाटील, सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा नारायणकर प्रा.एस .आर.पाटील, प्रा.कृष्णात देवकर, शिवसेना उप शहर प्रमुख अनिल दंडगुले शशिकांत विभुते सर, आप्पा राव कदम, मुजावर दारूवाले, ERT समुहाचे बबलु बागवान , प्रभाकर यादगिरी, जयंत कदम, अशोक कांबळे, अमर साळुंखे, प्रा. अनिल लोंढे, ॲड.सुनिल क्षीरसागर, ॲड . युवराज आवताडे, ॲड.अभय बिराजदार, ॲड.राहुल गायकवाड,ॲड.जयंत शिंदे , गजेंद्र माशाळ, शिवाजी कोळी, प्रभाकर फलमारी,दशरथ लोकुर्ती, रमेश क्षीरसागर, सद्दाम शेख, बाळासाहेब कांबळे, विजय दासरी, रोहन श्रीराम, नांगमणी भंडारी, योगेश परशी आदींची उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कायदा विभाग प्रमुख पदी निवड झालेले ॲड. दादासाहेब जाधव व ॲड.अविनाश कडलासकर ,यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी देखील निवडणूकी साठीची रणनिती कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले.

