पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिनियर बालरोगतज्ञ डॉ.श्रीकांत देवकते, लायन डॉ. ओजस देवकते, लायन डॉ. प्रेरणा देवकते यांनी दरवर्षीच्या नियमाप्रमाणे याही वर्षी अतिशय दिमाखात बालदिनाची तयारी केली होती.
संपूर्ण दवाखान्याची सजावट करून बालकांना आनंद वाटेल असं वातावरण तयार केलं होतं. लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमही यावर्षी या सेलिब्रेशन मधे सामील झालं होतं.
प्रथम मा. डॉ. श्रीकांत देवकते व लहान बालकांनी केक कटींग करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ला. डॉ. प्रेरणा देवकते यांनी बालदिनाचे महत्व सांगून सर्व बालकांना शुभेच्छा दिल्या. ला. ललिता कोळवले यांनी बालरोगतज्ञ डॉक्टर देवकते फॅमिली व उपस्थित बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. ओजस देवकते यांनी बालरुग्णांविषयी ते करत असलेल्या कार्याविषयी, मोफत आरोग्य योजनाविषयी व कॅन्सर तज्ञ ला. डॉ. इनामदार यांच्यासोबत बालवयातील कॅन्सर बाबत विशेष उपचार करण्याबाबत प्रयत्नशील असल्याबाबतची माहिती सांगितली व बालकांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. देवकते यांनी लहान मुलांना खेळणी व खाऊ बक्षीस दिला व मुलांना खूष केले.
या कार्यक्रमासाठी ला. कृत्तांजली देवकते व देवकते हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

