पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलची विद्यार्थिनी आर्या सावंतने १३ वर्षाखालील गटात विभागीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत आर्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दाखवलेले खेळातील कौशल्य आणि संघभावना यामुळे तिची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
आर्याला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक कविता कटारिया यांनी तिच्या मेहनतीचे आणि शिस्तबद्ध सरावाचे कौतुक केले. तसेच शाळेचे प्राचार्य शिवाजी गवळी यांनी आर्या आणि तिच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करत सांगितले की, “आर्याने मिळवलेले यश हे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. मुलींनीही क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन आपली चमक दाखवावी.” असे आहावन त्यांनी यावेळी केले आणि आर्या सावंतला पुढील विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

