नाशिक प्रतिनिधी तेज न्यूज
जिथे कमी, तिथे आम्ही!नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक व श्रीराम आय क्लिनिक (डॉ. अर्पित शहा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
असं म्हणतात, “डोळ्यांएवढा सुंदर मोती जगात कुठलाच नाही” कारण डोळ्यांची भाषा ही न्यारी — शब्दांशिवाय सर्व काही व्यक्त करता येतं, आणि गरज पडल्यास न बोलताही बरंच काही सांगता येतं.“म्हणूनच — चला, जागवू या सुंदर दृष्टीची जाणीव आणि ठेवू या ती निरोगी आयुष्यभर!
या शिबिराचे आयोजन नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या “रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या संकल्पनेतून करण्यात आले होते.
डॉ. अर्पित शहा यांनी त्यांच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने शंभरहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी केली.
डॉ. शहा यांनी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक सवयी, दृष्टी चांगली ठेवण्यासाठी उपाय आणि दीर्घकाळ निरोगी दृष्टी टिकवण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
स्नेहल देव यांनी सांगितले की, अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन ग्रामीण व गरजू भागांमध्ये नियमितपणे करून रुग्णसेवेचे कार्य अधिक व्यापक करायचे ठरवले आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक मोहनलाल लोढा, कविता सिंग, कल्पना सावकार,किशोर, राजेंद्र बाफना, अविनाश बनाईत, चारूदत्त कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गजानन गायकवाड, उलमेज सय्यद, सौरभ देवरे, रोशन कदम, ऋतिका पाटील, अंजली भालेराव, अपेक्षा जात, लक्ष्मी खरे, संगीता पाटोळे,संदीप देव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


