पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुका यांच्या वतीने मतदान जागृती अभियानाची सुरुवात मतदान जागृती अभियान स्टिकर लावून करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,तालुका कोषाध्यक्ष सागर शिंदे , तालुका सदस्य सागर कोळेकर ,शहाजी जाधव उपस्थित होते.



